महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएएसआरडीसी) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे गावाजवळ (मुंबईच्या दिशेने) स्वागत कमान बसविण्याचे काम शुक्रवारी हाती घेण्यात आले होते. त्यामुळे दुपारी बारा ते दोन या वेळेत वाहतुकीत बदल करण्यात आल्याने महामार्गावर शुकशुकाट होता.  

या कालावधीत दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे द्रुतगती मार्ग उर्से पथकर नाक्यावर वळविण्यात आली होती. शनिवार-रविवार असल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. तसेच रस्ते महामंडळाकडून एकच दिवस आधी वाहतुकीतील हा बदल जाहीर करण्यात आल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.