पुणे : महाविद्यालयीन नाट्यविश्वातील प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी रंगणार आहे.

या फेरीत नऊ महाविद्यालयांच्या संघांची सादरीकरणे होणार असून, महाविद्यालयीन रंगकर्मींचा नाट्यजल्लोष भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच झाली. आता अंतिम फेरीत आयएमसीसी (वरात), कावेरी महाविद्यालय (सफर), पद्माभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कला?) बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (मंजम्मा पुराणम्) श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय (एव्री नाइट इन माय ड्रीम्स), पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर (सहल), मॉडर्न महाविद्यालय गणेर्शंखड (भाग धन्नो भाग), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (पाणीपुरी) आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय (कम्प्लिट व्हॉइड) या संघांची सादरीकरणे होतील. अंतिम फेरीचे परीक्षण रंगकर्मी  चिन्मयी सुर्वे, शैलेश देशमुख आणि नितीन धंदुके  करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्रीय कलोपासकचे मंगेश शिंदे यांनी दिली.