पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातील रक्षकास अटक केली. मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७ ,रा. रक्षकनगर, खडकी) याला मंगळवारी अटक करण्यात आली. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. २ ऑक्टोबर रोजी तो बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यादिवशी कारागृह रक्षक शेख वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्तात होता. शेखने ललितला पसार होण्यास मदत केल्याचे तपासात उघडकीस झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – मावळ लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, आमदार शेळके म्हणाले, “मोदींच्या लाटेवर…”

हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमधील ‘हे’ नेत्र रुग्णालय रुग्णांसाठी ठरतंय आशादायी! परराज्यांतून येत आहेत रुग्ण

शेखच्या मोबाइल क्रमंकावरुन २ ऑक्टोबर रोजी ललितने ॲड. प्रज्ञा कांबळे, अभिषेक बलकवडे, विनय आराहाना यांच्याशी संपर्क साधला होता. याप्रकरणात कांबळे, बलकवडे, आरहाना यांनाही अटक करण्यात आली होती. शेवते आणि शेख यांना अटक करुन मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Story img Loader