मुंबई : पहाटेपासूनच मुंबईमधील अनेक भागांमध्ये गणेश विसर्जनाच्या उत्साहाचे वातावरण आहे. फुलांचा वर्षाव, गुलाल, ढोल ताशांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणुका मुंबईतील रस्त्यांवरून निघत आहेत. या जल्लोषात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मिरवणुकांमध्ये काहीसा गोंधळ झाला. मात्र, काही वेळातच भाविक पुन्हा उत्साहाने गणरायाचा जयघोष करण्यात गुंग झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लालबाग परिसरापासून गिरगाव चौपाटीपर्यंत सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यासाठी तसेच विविध मंडळांच्या गणेशमूर्तींचे लोभसवाणे रूप पाहण्यासाठी भाविकांची या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. अशातच अचानक कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे भाविकांचा गोंधळ झाला. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानाच्या छताखाली भाविकांनी आसरा घेतला.

हेही वाचा : Mumbai Ganpati Visarjan 2023 Live : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थायलंडच्या पर्यटकांची हजेरी

काही भाविक छत्री आणि रेनकोट घेऊन पूर्ण तयारीनिशी मिरवणुका पाहायला आले होते. छत्री असणाऱ्या भाविकांनी इतरांनाही छत्रीत आसरा दिला. अनेकांनी पुलाखालील आडोश्याला धाव घेतली. मात्र, काहीवेळात पुन्हा गणरायाच्या दर्शनासाठी भाविक सज्ज झाले. भर पावसात नव्याने नाचगाणे सुरू झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai rain started during ganesh visarjan excited devotees enjoying moments in heavy rain mumbai print news css
First published on: 28-09-2023 at 17:17 IST