पुणे : वारजे भागात आदित्य गार्डन सोसायटीतील जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवांश पठाडे (वय ७) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाडे कुटुंब मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. शिवांशचे आई- वडील खासगी कंपनीत नोकरी करतात.

हेही वाचा : शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार : म्हणाले, ‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सोसायटीतील लहान मुलांसाठी असलेल्या जलतरण तलावात शिवांशला त्याच्या आई-वडिलांनी उतरविले. त्यानंतर पठाडे दाम्पत्य सोसायटीच्या परिसरात फेरफटका मारत होते. पंधरा मिनिटांनी पठाडे दाम्पत्य जलतरण तलावाजवळ आले. तेव्हा तो जलतरण तलावात आढळून आला नाही. शिवांशचा शोध घेण्यात आला असता, तो पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.