पुणे: पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाने आळंदीतील इंद्रायणी नदीत उडी मारली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. अनुष्का केदार (वय- २० वर्षे) असे इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे.

हेही वाचा : “महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय, विधानसभेला बारा जागा हव्या”, कोणी केली मागणी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस आहेत. दिघी- वडमुखवाडी या ठिकाणी राहणाऱ्या अनुष्का यांनी साडेपाचच्या सुमारास चाकणकडे जाणाऱ्या पुलावरील गरुड खांबापासून इंद्रायणी नदीत उडी घेतली. हे बघताच तिथे उपस्थित असलेल्या तरुणाने देखील त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनुष्का वाहून गेल्या अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. अनुष्का यांचा अग्निशमन दल शोध घेत आहेत. अनुष्का यांनी त्यांच्या खासगी जीवनातील वैयक्तिक कारणामुळे असं टोकाचं पाऊल उचलल्याची भीती पोलिसांकडून वर्तवली जात आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.