scorecardresearch

Premium

नवले पूल परिसरात पुन्हा अपघात; टेम्पो उलटून एकाचा मृत्यू

टेम्पोचालक खान याने पहाटे साडेचारच्या सुमारास नवले पुलाजवळ टेम्पो लावला होता.

pune one died in accident, accident at navale bridge pune
नवले पूल परिसरात पुन्हा अपघात; टेम्पो उलटून एकाचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात भरधाव ट्रकने टेम्पोला धडक दिली. अपघातानंतर टेम्पो उलटून एकाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे घडली. अली मोहम्मद यार मोहम्मद (वय २१, रा. दिरीहार, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोचालक मसिहउद्दीन खान (वय ३६, रा. शिळ फाटा, कौसा, जि. ठाणे) याने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पोचालक खान याने पहाटे साडेचारच्या सुमारास नवले पुलाजवळ टेम्पो लावला होता.

हेही वाचा : पुणे : मिळकतकरात ४० टक्के सवलतीसाठी आज शेवटचा दिवस… अर्ज स्वीकारण्याची ‘या’ ठिकाणी व्यवस्था

Ajit Pawar admits that it was a mistake to nominate Dr Amol Kolhe Pune
डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्यात चूक; अजित पवार यांची कबुली
Chakshu system will prevent cyber fraud Pune print news
‘चक्षू’ प्रणाली रोखणार सायबर फसवणूक
What is the plan of Savitribai Phule Pune University regarding academic documents Pune news
विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक कागदपत्रे; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची योजना काय?
Leopards escape from Katraj Zoo Pune print news
कात्रज प्राणिसंग्रहालयातून बिबट्या पसार ? बिबट्या उद्यानात सापडल्याची प्रशासनाची माहिती

टेम्पोत खान आणि मदतनीस मोहम्मद होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टेम्पोला धडक दिली. टेम्पो उलटल्यानंतर मोहम्मद गंभीर जखमी झाली. टेम्पोचालक खान याला दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या ट्रकचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करत आहेत. नवले पूल परिसरात दोन दिवसांपूर्वी भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune one died in accident at navale bridge tempo overturned pune print news rbk 25 css

First published on: 30-11-2023 at 16:57 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×