पिंपरी- चिंचवड: लोणावळ्यात यावर्षी जून च्या अखेरीस पर्यंत पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. गेल्या वर्षीच्या तुनलेत यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. चालू वर्षात आत्तापर्यंत १ हजार ९९८ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप अधिक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ६६२ मिलिमीटर पाऊस झाला होता.
यावर्षी मात्र पावसाने मे महिन्यात च हजेरी लावल्याने गेल्या वर्षीचे सर्व रेकॉर्डब्रेक होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या २४ तासात देखील ७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लोणावळ्यात दररोज पाऊस कोसळत आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. शनिवार, रविवार विकेंड ला पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट पर्यटकांनी गजबजून जात आहे. काही पर्यटनस्थळी प्रतिबंध असला तरी याकडे पर्यटक पाठ फिरवून थेट पर्यटनस्थळे गाठत आहेत.
लोणावळा पोलिसांना देखील पर्यटक जुमानत नाहीत, असं चित्र आहे. प्रतिबंध केल्याने लोणावळ्यातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, पर्यटकांनी लोणावळा शहर फुलत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रफुल्लित वातावरण आहे. लोणावळ्यातील व्यापाऱ्यांचा मान्सून हाच सिजन असतो. याच काळात त्यांचा व्यवसाय जोमाने चालतो. यात हॉटेल, चिक्की विक्रीचा मोठा सहभाग आहे.