पुणे प्रतिनिधी: पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रकल्पा बाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. ही बैठक विशेष अर्थाने चर्चेत राहिली. ती म्हणजे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या या बैठकीत निमंत्रण नसून देखील भाजपचे नेते गणेश बिडकर बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे त्या बैठकीवर रवींद्र धंगेकर यांनी बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

त्या घटनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, रवींद्र धंगेकर यांना बैठकीला बोलवलं होतं. ते बैठकीला देखील आले. त्यांना पोहे वैगरे देण्यात आले होते.ते बैठकीमधून केव्हा बाहेर पडले. याबाबत मला माहिती नाही. पण रवींद्र धंगेकर यांनी बैठकीत सहभाग नोंदविला पाहिजे होता. यामध्ये आपले मुद्दे मांडून भूमिका मांडली पाहिजे होती. पण रात गयी बात गयी, निवडणूक झाली आहे. ते आता आमदार झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी घरी जेवायला बोलावलं तर मी नक्की जाईल. अशी भूमिका त्यांनी यावर मांडली होती.

आणखी वाचा- राहुल गांधी यांच्या विधानामुळे दुसरा गोडसे निर्माण होऊ नये: हिंदू महासंघाचे आनंद दवे

रवींद्र धंगेकर यांनी घरी जेवायला बोलावलं तर मी नक्की जाईल.अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडल्यावर सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील हे रवींद्र धंगेकर यांच्या घरी खरंच जेवण करण्यास जाणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला. त्याबाबत रवींद्र धंगेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ते पाहिल्यापासून म्हणतात who is धंगेकर, पण त्यांना माहिती नाही की,र वींद्र धंगेकर कोण आहे. अशा शब्दात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले की, मी काल बैठकीला गेल्यावर शहरातील प्रश्नावर चर्चा सुरू झाली. त्या बैठकीला अचानक गणेश बिडकर आले आणि बोलण्यास सुरुवात केली. गणेश बिडकर हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसून कसे काय बैठकीला उपस्थित राहू शकतात. तसेच तेथील एकूणच परिस्थिती लक्षात घेतल्यावर मी तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ते पुढे म्हणाले की, मला तर तिथे चंद्रकांत पाटील ओळखच देत नव्हते. पण आपली एक संस्कृती आहे. जो आपल्या घरी येईल. तो आपला परमेश्वर आहे. साधू संत येती घरा तोचि दिवाळी, दसरा असे म्हणत ते आपल्यासाठी संत आहेत. त्याच बरोबर आपले दरवाजे सर्वासाठी खुले असून आपण सर्वाना जेवायला बोलवतो. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांना नक्कीच जेवायला बोलवणार असल्याचे त्यांनी सांगितले.