सिंहगड रस्त्यावरील नर्‍हे येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला. आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा संशय पोलसांनी व्यक्त केला आहे. सुनील राधाकिसन नलवडे (वय ५४, रा. भैरोबा नाला, फातिमानगर) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे (वय ५७) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नर्‍हे येथील अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेन्सी जवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा- रिक्षावर झाड कोसळून चालकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नलवडे हे पूर्वी लष्कर भागात झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करीत होते. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेंन्सी जवळ एका चार चाकी गाडीमधून पाच ते सहा जण सुनिल नलवडे यांना घेऊन आले.  त्यानी लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले़ पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली़. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. पहाटे उपचार सुरु असताना त्यांचा  मृत्यू झाला.

हेही वाचा- शाळकरी मुलाचा लैगिंक छळ; माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही वर्षांपूर्वी सुनील नलवडे यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यु झाल्याने ते एकटेच रहात होते. झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम ते करत होते त्यांनी काही जणांकडून कर्ज घेतल्याची माहिती मिळाली आहे.