पुणे: विसर्जन मिरवणुकीत घातक लेझर दिवे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला होता. अनेक मंडळांनी पोलिसांचे आदेश धुडकावून लेझर झोत आणि ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर केल्याचे दिसून आले. विसर्जन मिरवणुकीत लेझर झोत आणि आणि ध्वनीवर्तक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला. सोमवारी रात्रीपासूनच मंडळांनी मिरवणुकीची तयारी सुरू केली. अनेक मंडळांनी लोखंडी सांगाडे उभे करून लेझर दिवे आणि ध्वनीवर्धक यंत्रणा लावली. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या बहुतांश सर्व मंडळांनी पोलिसांच्या आदेश धडकावून लेझर दिव्यांचा वापर केल्याचे दिसून आले. उपनगरातही ही परिस्थिती होती. दणदणाटामुळे नागरिकांना त्रास झाला.

हेही वाचा : अखेर भाजपा नेते बापूसाहेब पठारे यांचा शरद पवार गटात प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता १२६ पथके तैनात करण्यात आली आहेत. पथकाकडून ध्वनीवर्धकाची आवाजाची मर्यादा तपासण्यास सुरूवात झाली आहे. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता, तसेच घातक लेझर झोतावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. पोलिसांचे आदेश धुडकावून विसर्जन मार्गावरील बहुतांश सर्व मंडळांनी घातक लेझर दिवे आणि उच्च क्षमतेचे ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. मिरवणूकीदरम्यान आवाजाचे उल्लंघन करणार्‍या मंडळावर कारवाई करण्यासाठी १२६ पथके तैनात करण्यात आली आहेत. जी मंडळे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवाजाची पातळी तपासणाऱ्या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे.