रामकृष्ण हरी प्रतिष्ठानच्या वतीने माजी खासदार विदुरा नवले यांना ‘रामकृष्ण मोरे कृतज्ञता पुरस्कार’ आणि कुस्ती परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांना ‘रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी (८ नोव्हेंबर) पुण्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
संस्थेचे संस्थापक हरी चिकणे यांनी याबाबतची माहिती दिली. एस. एम. जोशी सभागृहात मंगळवारी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांकडून रिक्षाचालकावर चाकुने वार ; नगर रस्त्यावरील घटना
बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष देवेशचंद्र ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, तरप्रमुख पाहुणे म्हणून श्रीरंग बारणे असणार आहेत.या समारंभात माजी मंत्री अनंतराव थोपटे, मदन बाफना, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, राम कांडगे, सूर्यकांत पालांडे, संभाजी कुंजीर, दिलीप ढमढेरे, जगन्नाथ शेवाळे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.