पुणे शहरात आज करोनाच्या संसर्गाने कहर केला. दिवसभरात नव्याने ६२० रुग्ण आढळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १२, ४७४ एवढी झाली आहे. तर दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आज अखेर ५१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या १७१ रुग्णांची आज पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आज अखेर ७, ४३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आज नव्याने ९८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत अकराशेपेक्षा अधिक जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १,७६८ वर पोहचली आहे.