अद्वय सरदेसाई साहित्य ४५ मिली संत्र्याचे सिरप, ४५ मिली लिची सिरप, ४५ मिली लिंबू रस, १८५ मिली सोडा, संत्र्याच्या फोडी आणि सजावटीसाठी पुदिना. कृती संत्रे आणि लिची सिरप एका लांबट ग्लासमध्ये ओता. त्यात बर्फ भरून घ्या. यामध्ये लिंबाचा रस आणि सोडा घालून ढवळा. संत्र्याच्या फोडी आणि पुदिन्याची पाने घेऊन सजावट करा.