How to Make Raisins: मनुक्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. कोणताही गोड पदार्थ बनवताना मनुका आवर्जून घालतात. याने पदार्थाची चव देखील वाढते. मनुका सहसा प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असतात. मनुका खाण्याचे आपल्या शरीराला देखील भरपूर फायदे होतात. शरीरातील रक्त वाढवण्यासाठी तसंच रक्त स्वच्छ करण्यासाठी मनुका फायदेशीर ठरतात.

मनुका आपल्याला सहज बाजारात मिळतात.
मनुक्यांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार असतात. त्यांच्या प्रकारानुसार मनुकांच्या किंमती बदलत असतात. आज आज आपण द्राक्षांपासून मनुके कसे बनवता येईल याची सोपी पद्धत पाहणार आहोत हे मनुके घरी बनवल्याने तुम्हाला पैसेही जास्त लागणार नाहीत आणि अगदी कमी सामानात हे मनुके बनवून तयार होतील चला तर मग जाणून घेऊया..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या बटरपासून फक्त २ मिनिटांत बनवा ‘दही वडे’; जाणून घ्या इंस्टंट रेसिपी)

द्राक्षांपासून मनुके बनवण्याची पद्धत

  • मनुके बनवण्यासाठी हिरवी द्राक्ष घ्या आणि त्यांना उकळत्या पाण्यात ५ ते १० मिनिटं शिजवा.
  • त्यानंतर ही द्राक्षे थंड पाण्यात घाला.
  • यानंतर द्राक्षांचे देठ मोडून टाका आणि त्यांना एका कोरड्या कापडावर ठेवा.
  • त्यांनंतर द्राक्षे एका स्वच्छ कापडानं पुसून घ्या.
  • त्यांनतर ही द्राक्षे २ ते ३ दिवसांसाठी सुकायला ठेवा.
  • द्राक्षांना पूर्णपणे सुकायला ४ ते ५ दिवस लागतात. जास्त मॉईश्चर असल्यास एक आठवडाही लागण्याची शक्यता असते.