पूर्वपरीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत विचारण्यात आलेले निवडक प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत:
* सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या :
१) सिंधू संस्कृती मुख्यत: धर्मनिरपेक्ष होती आणि ज्या धार्मिक गोष्टी या संस्कृतीत अस्तित्त्वात होत्या, त्या तितक्या प्रभावशाली नव्हत्या.
२) सिंधु संस्कृतीच्या काळात भारतात कापड बनविण्यासाठी कापसाचा वापर होत असे. वरीलपकी योग्य विधान/ विधाने कोणते/ कोणती?
१) फक्त १ २) फक्त २
३) १ व २ ४) वरीलपकी एकही नाही.
* प्रतिपादन (अ) : गांधार शैलीवर ग्रीकांचा प्रभाव जाणवतो,
कारण.. (ब) : हीनयान पंथ हा गांधार शैलीने प्रभावित झाला होता.
१) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्हीही बरोबर आहे. ‘ब’ हे ‘अ’चे योग्य स्पष्टीकरण आहे.
२) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्हीही बरोबर आहे. ‘ब’ हे ‘अ’चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३) ‘अ’ बरोबर आहे, ‘ब’ बरोबर नाही.
४) ‘अ’ बरोबर नाही, ‘ब’ बरोबर आहे.
* खालील विधाने पाहा :
१) आर्य समाजाची स्थापना १८३५ मध्ये झाली.
२) आपल्या सामाजिक सुधारणा कार्यक्रमांसाठी आर्य समाजाने स्वीकारलेल्या वेदप्रामाण्याच्या युक्तिवादास लाला लजपतराय यांनी विरोध केला.
३) केशब चंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मो समाजाने स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रचार केला.
४) विस्थापितांकरिता काम करण्यासाठी विनोबा भावे यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली.
वरीलपकी योग्य विधान/विधाने कोणती?
१) १ व २ २) २ व ३ ३) १ व ४ ४) ३ व ४
* इ.स. १८५४ च्या वुडच्या खलित्यात नमूद केलेले शिक्षणाचे ध्येय काय होते?
१) मूलनिवासी भारतीयांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
२) भारतात पाश्चात्य संस्कृतीचा प्रसार करणे.
३) शिक्षणाचा इंग्रजी माध्यमातून प्रसार करणे.
४) पारंपरिक शिक्षणपद्धतीत वैज्ञानिक संशोधक वृत्ती तसेच बुद्धीप्रामाण्यवाद यांचा अंतर्भाव करणे.
यूपीएससी- आधुनिक भारताचा इतिहास
मित्रांनो, आधुनिक भारताचा अभ्यास करताना काही गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय यांची कारकीर्द समजून घेतल्यास आधुनिक भारताचा अभ्यास करणे अधिक सुकर होते.
वॉरन हेिस्टग (१७७२ ते १७८५) : वॉरन हेिस्टग हा आधुनिक भारतातील अत्यंत विवादास्पद गव्हर्नर होता. तो अत्यंत लोभी होता. त्याने भारताची जबरदस्त लूट केली. मात्र, या काळात साहित्य आणि विद्य्ोला संरक्षण प्राप्त झाले.
- वॉरन हेिस्टगला प्रथम गव्हर्नर जनरल संबोधले जाते.
- १७७२ मध्ये वॉरन हेिस्टगने महसूल वसुलीचे ठेके जास्त बोली लावणाऱ्यांना वर्षभरासाठी दिले.
- वॉरन हेिस्टग्जने कलकत्ता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून सर एलिजाह इम्पे यांची नियुक्ती केली.
- नंदकुमार खटला : १७७५ मधील नंद कुमार हत्या खटल्यात वॉरन हेिस्टगचा संबंध.
- रेग्युलेटिंग अॅक्ट, १७७३ : यानुसार कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली.
- १७७८ मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली.
- वॉरन हेिस्टगने चार्ल्स विल्कीन्सद्वारे अनुवादित गीतेस प्रस्तावना लिहिली.