scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.


इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.


शरद पवार हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे. नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, दिपक साळुंखे पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) शिवसेना आणि इंडियन नॅशनल काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.


Read More
ajit pawar NCP, Nashik Lok Sabha Seat, lok sabha 2024, NCP Seat Demands Allocation in mahayuti, nashik lok sabha 2024, lok sabha 2024, bjp, eknath shinde shivsena, chhagan bhujbal,
नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क – अजित पवार गटाचा ठराव

महायुतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ राष्ट्रवादीनेच सोडवून घेतला पाहिजे, असा ठराव राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत करण्यात…

Shirur Lok Sabha Seat, Shivajirao AdhalRao Patil, Shivajirao AdhalRao Patil Declares Assets, Worth Rs 39 Crore, Shows Rs 6 Crore Increase, marathi news, lok sabha 2024, Shivajirao AdhalRao Patil assests Increase, shirur news,
शिवाजीराव आढळराव यांच्या मालमत्तेत सहा कोटींनी वाढ

महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण ३९ कोटी ६८ लाख १९० रुपयांची…

Sharad Pawar press conference _ 4
“त्यांची फाईल आज टेबलवरून कपाटात, पण उद्या…”, भाजपाबरोबर गेलेल्या नेत्यांना शरद पवारांचा इशारा

जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आहेत, तोपर्यंत अजित पवार यांच्यासह गेलेले नेते भाजपाला सोडणार नाहीत, असेही विधान शरद पवार यांनी…

Ajit Pawars convoy traveling in the opposite direction of the road in front of the traffic police
अजित पवारांच्या ताफ्याचा वाहतूक पोलिसांसमोरच रस्त्याच्या उलट दिशेने प्रवास! | Viral Video

अजित पवारांच्या ताफ्याचा वाहतूक पोलिसांसमोरच रस्त्याच्या उलट दिशेने प्रवास! | Viral Video

Sangli Congress Melava
सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात गोंधळ; विशाल पाटील समर्थकांची घोषणाबाजी

काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत आज मेळावा…

pankaja munde
9 Photos
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?

महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.

BJP state president, chandrashekhar bawankule, Criticizes sharad pawar NCP s Manifesto, Deceptive manifesto, bjp, sharad pawar ncp, lok sabha 2024, election 2024, election campaign, criticise, marathi news,
“शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शपथनामा’ ही जनतेची फसवणूक,” भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे. त्यांना या जाहीरनाम्यावर मत मिळणार नाहीत, अशी टीका…

sharad pawar
10 Photos
Lok Sabha Election 2024 : महिला आरक्षण ते तरुणांना भत्ता, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आश्वासनं काय? वाचा जाहीरनाम्याची माहिती

काय आहे शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात?

sharad pawar manifesto
Video: शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित; जातनिहाय जनगणना, महिला आरक्षणासह ‘या’ प्रमुख मुद्द्यांचा केला समावेश!

शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यात महिला आरक्षणाबरोबरच अग्नीवीर योजनेचाही उल्लेख करण्यात आला आहे.

malhar patil om rajenimbalkar
“पप्पा भाजपात, मम्मी राष्ट्रवादीत, त्यामुळे मल्हार पाटलांचा…”, ओम राजेनिंबाळकरांचा टोला प्रीमियम स्टोरी

अजित पवार गटाने भाजपा नेते आणि तुळजापूरचे आमदार राणजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना येथून उमेदवारी दिली आहे. उमेदवारीसाठी…

Ranajagjitsinha Patil sharad pawar
“आमदार नसतानाही राणाजगजीतसिंह पाटलांना मंत्री केलं, पण त्यांचे…”, शरद पवार यांचा टोला

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे…

संबंधित बातम्या