Amazon ही जगातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्सपैकी एक आहे. आजकाल बहुसंख्य लोक या साइटवर विविध गोष्टी खरेदी करत आहेत. पण कधी कधी अ‍ॅमेझॉनवर ऑर्डर केलेली वस्तूमध्ये दोष असल्याचे पाहायला मिळते. या Damage Products मुळे अ‍ॅमेझॉन कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने Artificial Intelligence ची मदत घ्यायचे ठरवले आहे. सध्या AI टेक सर्वत्र पाहायला मिळत आहे. लोक वेगवेगळ्या ठिकाणी या तंत्राचा वापर करत आहेत. ही अशी एकूण पार्श्वभूमी असताना अ‍ॅमेझॉनने घेतलेल्या या निर्णयाने लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, सदोष गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहचू नये यासाठी ही कंपनी त्यांच्या प्रत्येक वेअरहाऊसमध्ये टेस्टिंगसाठी AI टेकचा वापर करणार आहे,

सध्या अ‍ॅमेझॉनच्या वेअरहाऊस, गोडाऊन्समध्ये ऑर्डर केलेल्या प्रोडक्ट्सची टेस्टिंग माणसांकडून करवून घेतली जात आहे. टेस्टिंग करताना अनेकदा वर्कलोड करताना Human Error येतो. अशा वेळी दोषयुक्त गोष्टी ग्राहकांकडे पोहचण्याची शक्यता असते. काही वेळेस पूर्णपणे खराब झालेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचते. माणसांकडून प्रोडक्ट्स चेक करवून घेणे एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि त्यासाठी बराचसा वेळ देखील खर्च होऊ शकतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. ही समस्या दूर व्हावी यासाठी कंपनीने टेस्टिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याचे ठरवले आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा

India today ने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉन कंपनीने अमेरिका आणि युरोपमधील १० वेअरहाऊसमध्ये AI टेकचा सेटअप करायला सुरुवात केली आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर मॅनेजर ख्रिस्तोफ श्वर्टफेगर यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान माणसांपेक्षा ३ पट जास्त काम करतो. कमी वेळात या तंत्रामुळे जास्तीत जास्त काम पूर्ण होते. AI ला काम शिकवण्यासाठी अ‍ॅमेझॉनने असंख्य फोटोग्राफ्सचा वापर केला आहे. त्यामध्ये सदोष आणि दोष नसलेल्या प्रोडक्ट्सचा समावेश होता. यातून AI ला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजवण्याचा कंपनीचा प्रयत्न केला होता.

Flipkart Mobile Bonanza Sale: आयफोनपासून ते गुगल पिक्सलपर्यंत अनेक स्मार्टफोन्सवर मिळत आहेत आकर्षक ऑफर्स

AI सेटअप –

जेव्हा एखादी व्यक्ती एक वस्तू ऑर्डर करेल, तेव्हा त्या वस्तूचे पीकिंग आणि पॅकेजिंग यांच्या दरम्यान निरीक्षण केले जाईल. जेव्हा ग्राहक ठराविक प्रोडक्ट निवडतील तेव्हा ते प्रोडक्ट एका डब्ब्यामध्ये ठेवली जाईल. हा डब्बा इमेजिंग स्टेशनवरुन पुढे पाठवण्यात येईल. या दरम्यान त्यामध्ये दोष असल्यास AI त्याची माहिती देईल. पुढे सुपरवायजर म्हणून काम करणारी व्यक्ती पुन्हा ते प्रोडक्ट तपासेल. जर खरंच त्यात काही दोष असेल, तर ते प्रोडक्ट बाजूला ठेवले जाईल. त्याला दोषरहित प्रोडक्ट Replace करेल.