Tips: अँड्रॉइड फोनमध्ये ‘या’ चुका करू नका; अन्यथा डिव्हाइस होऊ शकतं हॅक

आयफोनच्या तुलनेत अँड्रॉइड स्मार्टफोन स्वस्त आहे. त्यामुळे अँड्रॉ़इड फोन युजर्सची संख्या सर्वाधिक आहे.

smartphones-thinkstock-759
Tips: अँड्रॉइड फोनमध्ये 'या' चुका करू नका; अन्यथा डिव्हाइस होऊ शकतं हॅक (फोटो- Indian Express)

आयफोनच्या तुलनेत अँड्रॉइड स्मार्टफोन स्वस्त आहे. त्यामुळे अँड्रॉ़इड फोन युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक व्यवहार एका क्लिकवर केले जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसात फोन हॅकिंकच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अँड्रॉइड फोन वापरताना काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम असल्याने, स्कॅमर, हॅकर्स आणि जाहिरातदारांची त्यावर नजर असते. प्लेस्टोरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना काळजीपूर्वक केले पाहिजेत. तुम्ही काय डाउनलोड करत आहात आणि कोणत्या अ‍ॅप्सना किती परवानग्या आहेत, याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे.

मालवेअर व्यतिरिक्त अनेक अ‍ॅप्स आहेत जे सतत जाहिराती दाखवून पैसे कमवत असतात. तुमच्या अँड्रॉइड फोनसाठी अशाच काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. फोनसोबत येणार्‍या ब्लोटवेअर्समुळे काहीवेळा स्पेस आणि स्टॅबिलिटीची समस्या निर्माण होतात. हे अ‍ॅप्स शक्यतो अनइन्स्टॉल करा. काही अ‍ॅप्स तुमचा डेटा देखील गोळा करू शकतात आणि तुमच्या फोनवर जाहिराती दाखवू शकतात. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डाउनलोड केलेले अ‍ॅप्स सतत तपासत राहा. अनेक मालवेअर किंवा स्पायवेअर आयकॉनशिवाय अस्तित्वात आहेत. हे अ‍ॅप्स ताबडतोब डिलीट करा. तुमच्या गुगल खात्याचा पासवर्ड सतत अपडेट करत आहे.

व्होडाफोन आयडियाकडून 5G ची टेस्ट; स्पीड 4.1 जीबीपीएसपर्यंत मिळणार!

जर तुम्ही अज्ञात सोर्सकडून अ‍ॅप इंस्टॉल करण्याची परवानगी दिली असेल तर तुम्ही ते डिसेबल करा. यामुळे फोनमध्ये असलेले अ‍ॅप तुमच्या माहितीशिवाय कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करणार नाही. नेहमी फक्त प्ले स्टोअरवरून अ‍ॅप्स डाउनलोड करा. तुम्ही एपीके फाइलवरून अ‍ॅप इन्स्टॉल केल्यास ते तुमच्या डिव्हाइससाठी धोकादायक ठरू शकते. नवीन फोन घेतल्यावर, तुम्ही गुगल Find सेवा चालू करणे आवश्यक आहे. डिव्हाइस हरवल्यास त्याची मदत घेतली जाऊ शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dont make this mistakes in android phones otherwise the device may be hacked rmt

ताज्या बातम्या