scorecardresearch

WhatsAppने लॉन्च केले नवीन फीचर; चॅट करताना वापरकर्त्यांना घेता येणार भन्नाट अनुभव

WhatsApp Text Formatting: व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फिचरचा वापर यूजर्संना करता येणार आहे.

whatsapp launch news update for group admins
व्हॉट्सअ‍ॅप (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

WhatsApp Text Formatting: व्हॉट्सअ‍ॅप हा सर्वाधिक वापर केला जाणारा सोशल मीडिया अ‍ॅप आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतासह जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. करोना काळात लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, ऑफिसचे काम करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करत होते. अनेक व्यावसायिक कंपन्यांमध्येही अ‍ॅपचा नियमितपणे वापर केला जातो. सरकार देखील विविध योजना राबवताना व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेत असते. ग्राहकांपर्यंत उत्तमोत्तम सेवा पुरवण्यासाठी ही टेक कंपनी नेहमीच प्रयत्नशील असते.

व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे अनेक अ‍ॅप्स आल्याने सध्या या क्षेत्रामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप जुन्या ग्राहकांना टिकवण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठराविक दिवसांनी फीचर्समध्ये अपडेट करत असते. नुकताच या कंपनीद्वारे WhatsApp Text Formatting हे नवे फीचर सुरु करण्यात आले आहे.

WhatsApp Text Formatting म्हणजे काय?

चॅट करताना अनोखा, वेगळा अनुभव यावा यासाठी कंपनीने Text Formatting हे नव्या फीचर जोडले आहे. एखाद्या खास मुद्दाबाबत संदेश पाठवायचा असेल, समोरच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असल्यास केला जाणारा मॅसेज साध्या Font मध्ये असतो. ऑनलाइन बोलताना एखादा मुद्दा अधोरेखित करायचा असल्यास या फीचरची मदत घेता येईल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमुळे वापरकर्त्यांना मॅसेजच्या टाइपमध्ये बदल करता येणार आहेत. Bold, Italic, Combined Formatting अशा काही ऑप्शनचा समावेश या फीचरमध्ये केलेला आहे.

कसा करावा या नव्या फीचरचा वापर?

  • कोणताही शब्द किंवा परिच्छेद Bold करायचा असल्यास Asterisk (*) चा वापर करावा.
  • Underscore (_) चा वापरुन शब्द किंवा परिच्छेद Italic स्वरुपामध्ये दिसेल.
  • एखादा संदेश चुकून पाठवला गेला असेल, तर strikethrough वापरुन त्यात दुरुस्ती करता येते. यासाठी Tilde (~) ची मदत घ्यावी.
  • Monospace वापरायचे असल्यास backticks (“`) चिन्ह वापरावे.
  • लिहिलेली गोष्ट Combined Formatting करण्यासाठी (*_ ) या दोन चिन्हांचा वापर करावा.

हे फीचर वापरण्यासाठी वरील चिन्हे वाक्य, शब्द किंवा परिच्छेद यांच्या सुरुवातीला आणि शेवटी लिहणे आवश्यक आहे.

(याआधीही अशा प्रकारची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उपलब्ध होती.)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 14:36 IST
ताज्या बातम्या