thlogo06बाइक, स्कुटी अशा स्वयंचलित दुचाकींच्या वाढत्या प्रस्थामुळे विनाइंधन चालणारी सायकल आता मागे पडली आहे. तरीही ती कालबा मात्र झालेली नाही. सुदृढ आरोग्यासाठी दररोज सायकल चालवण्याचा सल्ला  फिटनेस तज्ज्ञांकडून दिला जात असल्याने इंधन वाचवण्यासाठी गाडय़ांचा वापर टाळून सायकलीने प्रवास करण्यालाही प्रोत्साहन दिले जात आहे. अर्थात हीच सायकल सध्या अनेक घरांच्या चांगल्या वर्तमानाला हातभार लावतानाही दिसते. ठिकठिकाणी फिरून विक्री व्यवसाय करणाऱ्यांना सायकलीसारखा दुसरा मित्र नाही.  सकाळी दारावर दूध किंवा वर्तमानपत्र घेऊन येणारे वितरक असोत, सायकलीची घंटी किंवा भोंगा वाजवत दिवसभर हिंडणारे इडलीवाले असोत की रात्री-अपरात्री एखाद्या नाक्यावर चहाची किटली घेऊन उभे असलेले विक्रेते असोत, या साऱ्यांसाठी सायकल जिवाभावाची जोडीदारच बनते. मॅनेजमेंट गुरू असा लौकिक असणारे डबेवालेही सायकलीचाच वापर करतात. कुल्फी, रंगीबेरंगी फुगे अथवा आधुनिक युगातील पिझ्झा सायकलीमुळेच अगदी घरपोच मिळू शकतो. या साऱ्यांसाठी सायकल ही ‘एलिझाबेथ’च असते.
tp01 tp02 tp03  tp05