घोडबंदर येथील कापूरबावडी चौकाजवळ एका मोटारीला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कापूरबावडी चौक ते कोपरी येथील आनंदनगर आणि मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबईहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे आणि प्रवाशांचे हाल झाले.

हेही वाचा >>> कल्याण: पत्रीपूल ते पलावा चौकादरम्यान दुतर्फा वाहने उभी न करण्याचे आदेश ; कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाचा पथदर्शी प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्व द्रुतगती मार्गाहून घोडबंदरच्या दिशेने एक मोटार घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करत होती. ही मोटार बुधवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास कापूरबावडी पूलावरून चौकात येत असताना अचानक या मोटारीने पेट घेतला. त्यामुळे कापूरबावडी ते कोपरी येथील आनंदनगर जकातनाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई नाशिक महामार्गावरही जाणवला. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे आणि प्रवाशांचे हाल झाले. रात्री ९:१५ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती.