महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून परिचारीकांची संख्या कमी असून यामुळे इतर परिचारिकांवर कामाचा ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिचारीकांनी रुग्णालयाच्या आवारातच आंदोलन करत पारिचारिकांच्या भरतीसंबंधीचा प्रस्ताव तातडीने मंजुर करण्याची मागणी केली. सध्या या रुग्णालयामध्ये ९० परिचारीका काम करतात.

सकाळच्या शिफ्टच्या परिचारिकांमार्फत रुग्णालयात काम सुरु असून दुपारच्या शिफ्टमधील परिचारिकांमार्फत हे आंदोलन करण्यात आले. यामुळे रुग्णालयातील काम बंद केलेले नसल्याचे परिचारीकांनी स्पष्ट केले. दरम्यान हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून तो लवकरच मंजुर होईल असे रुग्णालयाचे अधिष्ठता डाॅ. भीमराव जाधव यांनी दिली.

या आंदोलंनामध्ये रुग्णालयातील परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. रुग्णालयात परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असल्याने संपूर्ण भार हा तेथील कार्यरत असलेल्या परिचारिकांवर पडत असल्याचा दावा कर्मचारी वर्गाने केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळात देखील या परिचारिकांनी कार्यकाळ सांभाळला असून या कालावधीमध्ये अनेक परिचारिका या आजारी पडल्या, बऱ्याच परिचारिकांनी व्हीआरएस घेतली आहे, असंही परिचारिकांनी सांगितलंय.