कल्याण : कल्याणमध्ये आधारवाडी भागात मंगळवारी व्हर्टेक्स गृहसंंकुलाच्या पंधराव्या माळ्यावर भीषण आग लागून अनेक सदनिकांचे नुकसान झाले. ही उंचावरील आग विझविण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेला ठाणे पालिकेचे वाहन बोलवावे लागले. यानंंतरच्या चर्चेतून कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन ताफ्यातील ५५ मीटर उंचीपर्यंत उच्चदाबाने पाण्याचा फवारा मारणारे ‘टर्न टेबल लॅडर’ (टीटीएल) जपानी बनावटीचे वाहन गेले कोठे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आले.

यावेळी पालिकेतील चर्चेतून धक्कादायक माहिती उघड झाली. जपानी बनावटीचे टर्न टेबल लॅडर (टीटीएल) ५५ मीटरपर्यंत उभ्या रेषेत उंचीवर पाण्याचा मारा करणारे वाहन काही महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. हे वाहन जपानी बनावटीचे असल्याने या वाहनाचे सुटे भाग, कुशल तंत्रज्ञ असा ताफा या सर्वांसाठी एकूण सुमारे ९० लाखाहून अधिकचा खर्च आहे.

Borgaonkarwadi parking lot, Kalyan,
सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
pune telemedicine service introduced in remote areas of state
राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील जनतेला ‘टेलिमेडिसीन’ सेवेचा आधार!
pink powder on los angeles
लॉस एंजेलिसमध्ये आग विझवण्यासाठी ‘पिंक पावडर’चा वापर कसा केला? पर्यावरणासाठी हे किती घातक?
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 

हे ही वाचा… शहापूरमध्ये बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील गावांमध्ये सौरकुंपण, शहापूर वनविभागाचा पथदर्शी प्रकल्प

नागरिकांच्या जीविताचा विचार करून टीटीएल वाहन दुरुस्त करण्यासाठीची एक नस्ती प्रशासनात काही महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पालिकेची नाजूक आर्थिक परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या निधीची नस्ती मंजूर करण्यात काही अधिकारी हात आखडता घेत आहेत. त्यामुळे ही नस्ती लालफितीत अडकली असल्याचे पालिकेमधील चर्चेतून समजते.

महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाच्या ५ (२) (२) या नियमाने मोठ्या निधीच्या नस्ती मंजूर करायच्या नाहीत. या सर्व प्रक्रिया विहित मार्गाने झाल्या पाहिजेत असा काही अधिकाऱ्यांचा मतप्रवाह आहे. या मतप्रवाहांमध्ये अग्निशमन वाहन ताफ्यातील टीटीएल वाहन देखभाल दुरुस्तीची नस्ती अडकल्याचे समजते. व्हर्टेक्स गृहसंकलातील उंच माळ्यांवरील आगीचा विचार करता आता तरी प्रशासनाने या नस्तीचा विचार करून ते अत्याधुनिक वाहन दुरुस्त करून घ्यावे, अशी पालिकेत चर्चा आहे.

सुसज्ज अग्निशमन विभाग

मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली पालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या जीवित, सुरक्षितेचा विचार करून अधिक तत्पर ठेवण्यात आला आहे. टीटीएल वाहनाने उभ्या रेषेत उंचीवर ५५ मीटरपर्यंत उभ्या रेषेत पाण्याचा मारा करता येतो. एवढी तत्पर यंत्रणा असताना व्हर्टेक्स संकुल येथे अग्निशमन वाहने येऊनही तात्काळ आग विझविण्याचे काम सुरू न करण्यात आल्याने रहिवाशांनी नापसंती व्यक्त केली.

हे ही वाचा… येऊरमध्ये पुन्हा धिंगाणा

या आगीच्यावेळी पालिकेचे टीटीएल वाहन तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचे आणि ठाण्याहून वाहन मागविल्याची कबुली मंगळवारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी माध्यमांना दिली होती. अधिक माहितीसाठी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

अग्निशमन विभागात उंदरांचा खूप उपद्रव आहे. त्यामुळे वाहनांना त्याचा त्रास होतो. टीटीएल वाहन तांत्रिक कारणामुळे बंद होते. दोन दिवसात ते दुुरुस्त होईल. दुरुस्ती निधीची नस्ती मंजुरीच्या प्रतीक्षेत असा काही प्रकार नाही. – नामदेव चौधरी, मुख्य अग्निशमन अधिकारी, कडोंमपा.

टीटीएल वाहन दुरुस्ती संबंधीच्या निधीविषयक नस्तीची आपणास पूर्ण माहिती नाही. माहिती घेऊन याविषयी आवश्यक कार्यवाही करतो. – अतुल पाटील, उपायुक्त, वाहन विभाग.

आपणास याविषयीची पूर्ण माहिती नाही. वाहन विभाग, अतिरिक्त आयुक्त गायकवाड यांच्याकडून माहिती मिळेल.- योगेश गोडसे, अतिरिक्त आयुक्त

Story img Loader