कल्याण : कल्याण-उल्हासनगर रेल्वे स्थानका दरम्यानच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बुधवारी दुपारी एका पोलिसाच्या तत्परतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले. हि महिला बुधवारी दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात आपल्या नऊ वर्षाच्या मुलीला घेऊन धावत्या अंबरनाथ लोकलमध्ये चढत होती. लोकलमध्ये चढत असताना मुलगी लोकलच्या डब्यात चढली, पण महिलेचा तोल जाऊन ती फलाटावरुन घरंगळत रेल्वे रुळाच्या दिशेने जात होती. तेवढ्यात तेथे गस्तीवर असलेल्या एका हवालदाराने हा प्रकार पाहून क्षणार्धात त्या महिलेला फलाटाच्या आतील भागात ओढून तिचे प्राण वाचविले.

या महिलेची मुलगी लोकल प्रवासात पुढे निघून गेली होती. लोकलमधील प्रवाशांनी या मुलीला धीर दिला. रेल्वे स्टेशन मास्तर, पोलिसांनी तातडीने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडल्या प्रकाराची माहिती अंबरनाथ रेल्वे स्थानकातील पोलिसांना दिली. या महिलेला गंभीर दुखापत किंवा अन्य काही इजा झाली नाही. हवालदार आठवले यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात जाऊन मुलीला ताब्यात घेतले. नंतरच्या बदलापूर लोकलने महिला अंबरनाथ रेल्वे स्थानकात पोहचली. तिला तिच्या मुलीचा ताबा देण्यात आला.

हेही वाचा : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचेही घरच्या घरी विसर्जन शक्य, अंबरनाथ पालिकेच्या मदतीने रोटरी क्लबचा नवा प्रयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाजमी सलीम शेख (३०) असे लोकल मधून तोल जाऊन पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या अंबरनाथ पूर्वेतील आंबेडकर नगर भागात राहतात. हवालदार माने यांच्या तत्परतेमुळे एका महिलेचे प्राण वाचल्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माने यांचे कौतुक केले. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.