scorecardresearch

ठाणे : लाच घेतल्या प्रकरणी कनिष्ठ लिपीक ताब्यात

बाळकूम येथील विद्या प्रसारक विद्यालयातील कनिष्ठ लिपीक अर्चना पाटील (४३) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ हजार ९०० रुपयांची लाच घेताना बुधवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अर्चना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांची भाची १० वी उत्तीर्ण झाल्याने तिच्या शाळा सोडण्याचा दाखला आणि गुणपत्रिका तक्रारदार यांना हवी होती. त्यासाठी अर्चना पाटील […]

ठाणे : लाच घेतल्या प्रकरणी कनिष्ठ लिपीक ताब्यात
प्रतिनिधिक छायाचित्र

बाळकूम येथील विद्या प्रसारक विद्यालयातील कनिष्ठ लिपीक अर्चना पाटील (४३) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ हजार ९०० रुपयांची लाच घेताना बुधवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अर्चना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांची भाची १० वी उत्तीर्ण झाल्याने तिच्या शाळा सोडण्याचा दाखला आणि गुणपत्रिका तक्रारदार यांना हवी होती. त्यासाठी अर्चना पाटील यांनी त्यांच्याकडून ५ हजार रुपयांची मागणी केली. या घटनेनंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून अर्चना यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

त्यानंतर बुधवारी पथकाने विद्या प्रसारक विद्यालयातील शाळेच्या कार्यालयात अर्चना यांना ३ हजार ९०० रुपयांची लाच घेताना हातोहात पकडले. याघटनेप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अर्चना यांना ताब्यात घेतले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या