Mumbra Thane Train Accident : मुंब्रा रेल्वे मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे गाडी दाखल होण्यापूर्वी एक तीव्र वळण आहे या वळणामुळेच हा अपघात झाल्याचा संशय जखमी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. त्यामुळे या वळणाची आता चर्चा रंगू लागली आहे.
मध्य रेल्वे स्थानकावर पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू होण्यापूर्वी जलद उपनगरीय रेल्वे गाड्या जुन्या पारसिक बोगद्यातून वाहतूक करत होत्या. आता एकूण सहा मार्गिक उपलब्ध झाल्याने पहिल्या आणि दुसऱ्या मार्गिकेवरून धीम्या उपनगरी रेल्वे गाड्या, तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेवरून वरून जलद उपनगरीय रेल्वे गाड्या तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेवरून एक्सप्रेस रेल्वे गाड्या वाहतूक करत आहेत.
जलद उपनगरी रेल्वे गाड्या या मुंब्रा रेल्वे स्थानकातील तीव्र वळणावरून जात असतात. परंतु या रेल्वे गाड्या मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबत नाही. गाड्या थांबत नसल्यातरी वळण आता कारणीभूत आहे का असा प्रश्न पडत आहे. या तीव्र वळणामुळेच हा अपघात झाला असावा असा संशय जखमी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
मच्छिंद्र गोतरणे यांचे नातेवाईक सचिन यांनी सांगितले की जेव्हा व तीव्र वळण आले तेव्हा हा अपघात झाल्याचे समजून येत आहे. परंतु नेमके कारण मच्छिंद्र यांच्याशी बोलल्यावरच समजू शकेल असे त्यांनी सांगितले. इतर जखमींच्या नातेवाईकही तीव्र वळण असल्याचं कारण देत आहे.