बदलापूर: गेल्या २४ तासात सुरू असलेल्या संततधर पावसामुळे बदलापूर आणि परिसरात पाणीच पाणी झाले आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने बदलापूरकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी एक संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. बदलापूर रेल्वे स्थानक आणि अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने बदलापूरहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून स्थानकावर दिली जाते आहे. तर बदलापूर कल्याण राज्य मार्गावरपाणी साचल्याने मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब लांब रांगा लागल्या आहेत.

गेल्या २४ तासांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात संतधर पाऊस सुरू आहे अचानक पावसाचा जोर वाढत असल्याने दोन्ही जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या, नैसर्गिक नाले भरून वाहत आहेत. कर्जत, नेरळमार्गे बदलापूर आणि कल्याण तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहते आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरण्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आहे. आपत्कालीन परिस्थितीत पालिका प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेकडून केले जाते आहे.

हेही वाचा >>>उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, काळू नदी इशारा पातळीवर, ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यासाठी बदलापूर नगरपालिकेने ७८८७८९१२०२ हा क्रमांक जाहीर केला आहे. संतधर पावसामुळे बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे रुळावर पाणी आले असून त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबईकडे जाणारी लोकल सेवा थांबवण्यात आल्याची माहिती रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडे कडून दिली जाते आहे त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांचा कोळंबा झाला आहे दुसरीकडे बदलापूर कल्याण राज्य मार्गावर अंबरनाथ शहरात पाणी साचल्याने हा मार्गही बंद करण्यात आला आहे काटे अंबरनाथ राज्य मार्गावर नेवाळीजवळ ठिकठिकाणी पाणी साचल्याचे समोर आले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.