डोंबिवली जवळील २७ गावातील व्दारली गाव येथे सकाळी अकरा वाजता पाच जणांच्या टोळीने एका जवाहिऱ्याच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दुकानात घुसून कामगारांना मारहाण केली. बंदुकीचा धाक दाखवून काही ऐवज लुटून नेला.

हेही वाचा- कल्याण-डोंबिवलीत रस्ते अडविणाऱ्या वाहन मालकांना वाहतूक विभागाच्या नोटिसा; वाहन जप्तची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामगार आणि दुकान मालकाने ओरडा करताच परिसरातील नागरिक जमा झाल्याने आपण पकडले जाऊ या भीतीने दरोडेखोरांनी एका चारचाकी वाहनातून पळ काढला. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने दरोडेखोरांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्दारली, मलंगगड रोड, उल्हासनगर नाका, शिळफाटा भागात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दरोडेखोरांनी कामगारांना केलेली मारहाण आणि आरोपींची ओळख पोलिसांना पटली आहे. चार तपास पथके तयार करुन ती रवाना करण्यात आली आहेत. ऐवज लुटण्याच्या की पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केला आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.