वरपच्या सेक्रेड हार्ट शाळेच्या विद्यार्थ्यांनी घारापुरी लेणी ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यानचा समुद्र पोहून पार केला आहे. या जलतरण मोहिमेत इयत्ता सातवी आणि आठवीचे सहा विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी १६ किलोमीटरचा प्रवास अवघ्या ३ तास ४५ मिनिटांत पूर्ण केला.

हेही वाचा- कल्याणमधील भीषण आगीत आजी, नातीचा होरपळून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेक्रेड हार्ट शाळेचे विद्यार्थी जलतरण मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत त्यांना घारापुरी अर्थात एलिफंटा लेण्यांपासून ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा समुद्र पार करायचा होता. या १६ किलोमीटर लांबीच्या समुद्र जलतरण मोहिमेत इयत्ता सातवी आणि आठवीतील सक्षम म्हात्रे (८ अ), श्रीरंग साळुंके (८ ई), अभिप्रीत विचारे (८ ड), अमोधिनी तोडकर (७ क), रोनित म्हात्रे (८ अ), सिद्धेश पात्रा (७ ई) हे विद्यार्थी सहभागी झाले होते. यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक रामचंद्र म्हात्रे, भूषण जाधव, अनुज कुमार हेही यावेळी उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांनी१६ किमी लांबीचा पोहण्याचा प्रवास अवघ्या ३ तास ४५ मिनिटांत पूर्ण केला. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांच्या हस्ते स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात आले.