ठाणे – ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त पंकज शिरसाट यांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री झाला. या घटनेत पंकज शिरसाट हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालकाला अडविताना हा प्रकार झाल्याचे उघड झाले असून रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ठाणे वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून उपयुक्त पंकज शिरसाट हे कार्यरत आहेत. घोडबंदर येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंकज शिरसाट हे येथील एका उड्डाण पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका रिक्षामध्ये चार प्रवाशांची वाहतूक रिक्षा चालक करत होता. शिरसाट यांनी त्या रिक्षाचालकाला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्या रिक्षाचालकाने त्यांच्या अंगावर रिक्षा घातली. या घटनेत शिरसाट हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर चितळसर पोलीस ठाण्यात जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. रिक्षा चालकाला अटक झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.