गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे कागदावर असलेले मुलुंड आणि ठाणे दरम्यानच्या नवीन स्थानक प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी या नवीन स्थानकाच्या विषयाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याच्या सूचना गुरूवारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेले १५ प्रकल्प हे नियोजित वेळेत पूर्ण व्हायलाच हवेत आणि त्यातील सीसीटीव्ही प्रकल्पाची अमलबजावणी करताना त्याचा पोलिसांना सर्वाधिक उपयोग होईल, याची दक्षता घ्या, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा- शिंदेंनी दर्शन न घेतल्याने देवीचं विसर्जन थांबवलं: मनसेचा मंडळाला इशारा; “देवापेक्षा CM मोठे झाले का? विसर्जन करा अन्यथा…”

ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे १०५० कोटी रुपयांच्या कामाचा आढावा आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी सर्व प्रकल्पांची माहिती व सद्यस्थितीचे सादरीकरण केले. एकूण ३९ प्रकल्पांपैकी २४ पूर्ण झाले असून १५ प्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अतिक्रमणे, वनखात्याचे आक्षेप, जनहित याचिका आदींमुळे प्रकल्पांच्या कार्यकाळात होत असलेल्या विलंबाबद्दलही माळवी यांनी आयुक्त बांगर यांना अवगत केले.

हेही वाचा- विश्लेषण : चौथ्या मुंबईला विकास प्रकल्पांचे बळ का हवे? बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा कधी होणार कोंडीमुक्त?

ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्पांची वाटचाल आणि गावदेवी मैदानाखालील भूमिगत पार्किंग कामांबाबत आयुक्त बांगर समाधान व्यक्त केले. मुलुंड आणि ठाणे दरम्यानच्या नवीन स्थानकाच्या विषयाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. गटारांची कामे पावसाळ्यानंतर तीन महिन्यात पूर्ण करावीत. पुढील पावसाळ्यापर्यंत ही कामे रेंगाळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या नातवावरील वक्तव्यावरून नरेश म्हस्केंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “तेव्हा श्रीकांत शिंदेंच्या आई आणि पत्नी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडलेले ४०० कॅमेरे आणि पालिकेच्या हाजुरी येथील सेंटरशी जोडलेले १७०० कॅमेरे यांचे एकत्रिकरण करावे. या दोन्ही यंत्रणांचा सर्वाधिक उपयोग पोलिसांना होईल, हे लक्षात घेऊन ही यंत्रणा प्राधान्याने जोडून घ्यावी. कामे करताना कोणत्याही समस्या आल्या असतील तर त्यावर मार्ग काढून हा प्रकल्प उपयोगी कसा होईल हे पहावे, अशी सूचना आयुक्तांनी संंबंधितांना केली.