scorecardresearch

ठाण्यात चार ते पाच दिवस पाणी टंचाई, जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे चार दिवस ५० टक्केच पाणी पुरवठा

पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पालिकेने पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन केले आहे.

Water shortage Thane
ठाण्यात चार ते पाच दिवस पाणी टंचाई (संग्रहित छायाचित्र)

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य जलवाहिनीच्या गळतीची दुरुस्ती, तीन हात नाका येथे मुख्य जलवाहिनीची जोडणी करणे, दैनंदिन देखभाल दुरुस्ती अशी विविध कामे २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पाणी पुरवठा विभागाकडून केली जाणार आहेत. या कामांमुळे शहरात केवळ ५० टक्के पाणी पुरवठा केला जाणार असल्याने अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पालिकेने पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन केले आहे. यानुसार मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ अशा १२ तासांसाठी घोडबंदर रोड, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, मंगळवारी रात्री ९ ते बुधवारी सकाळी ९ या कालावधीत गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती, सिद्धांचल, कारागृह परिसर, साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी, कळवा, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, रघुकूल आणि मुंब्रा येथील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा – ठाणे : संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागांत पाणी पुरवठा बंद राहील. बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ या वेळेत गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी, कळवा, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, रघुकूल आणि मुंब्रा येथील काही भागांतील पाणी पुरवठा बंद राहील. गुरुवारी सकाळी ९ ते शुक्रवारी सकाळी ९ अशा २४ तासांसाठी इंदिरानगर, लोकमान्य नगर, किसननगर, श्रीनगर, शांतीनगर, रामनगर, रुपादेवीपाडा, सावरकर नगर, डवलेनगर, आंबेवाडी, परेरा नगर, झांजेनगर, साठे नगर, कैलासनगर, भटवाडी या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर, गुरुवारी सकाळी ९ ते रात्री ९ अशा १२ तासांसाठी सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागांत पाणी पुरवठा बंद राहील. गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी सकाळी ९ अशा १२ तासांसाठी घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा, भाईंदरपाडा या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

हेही वाचा – कल्याण : टिटवाळा-खडवलीदरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ या काळात सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी सकाळी ९ या कालावधीत घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागात पाणी पुरवठा बंद राहील. या बंदनंतरपाणी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत आणखी दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 22:48 IST