News Flash

ट्रेक डायरी: पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण

‘शिवशौर्य ट्रेकर्स’तर्फे येत्या १० ते १३ जुलै दरम्यान पन्हाळा -पावनखिंड - विशाळगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढ वद्य प्रतिपदेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज

| June 18, 2014 07:29 am

पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण

‘शिवशौर्य ट्रेकर्स’तर्फे येत्या १० ते १३ जुलै दरम्यान पन्हाळा -पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढ वद्य प्रतिपदेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावरून निघून पावनखिंडमार्गे विशाळगडावर पोहोचले होते. या वेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत आपल्या प्राणाची आहुती देत महाराजांची वाट निर्धोक केली होती. यंदा या रणसंग्रामास ३५४ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृतिप्रीत्यर्थ बरोबर या दिवशी पन्हाळा -पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण या मोहिमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम शिवाजीमहाराज ज्या वाटेने गेली त्याच वाटेने जाणार आहे. या मोहिमेदरम्यान सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९३२०७५५५३९, ९८६९०८४९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
उंबरखिंड भ्रमंती
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या २२ जून रोजी लोणावळय़ाजवळील उंबरखिंड परिसरात भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या खिंडीत शिवाजी महाराजांनी कर्तलबखानाचा पराभव केला होता. या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या खिंडीची अभ्यासक माहिती देणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

दूधसागर धबधबा भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या ५ जुलैपासून गोव्यातील दूधसागर धबधबा आणि जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.
मढेघाट दर्शन आणि रॅप्लिंग शिबिर
‘झेप’ संस्थेतर्फे येत्या २२ जून रोजी वेल्ह्य़ाजवळील मढेघाट परिसरात भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या भ्रमंतीत मढे घाट भ्रमंतीबरोबरच या परिसरात तज्ज्ञांच्या उपस्थितीत ‘रॅप्लिंग’च्या शिबिराचेही आय़ोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८५००००४८७ किंवा ८०८७४४८२९७ या क्रमांकावर संपर्क साधावा. ]

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2014 7:29 am

Web Title: trek diary 44
टॅग : Treck It,Trek Diary
Next Stories
1 सहय़ाद्रीतील जंगलात ‘गिरिमित्र’ रमणार
2 चावंडची भ्रमंती
3 ऑफबिट कळसुबाई..
Just Now!
X