News Flash

नरेंद्र मोदींचा मास्क घेण्यास नकार; व्हिडीओ व्हायरल

'मोदींसारखं वागू नका, मास्क घाला'

करोना संकट अद्यापही टळलं नसून आरोग्य मंत्रालय वारंवार सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना वारंवार आवाहन करत असतात. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहेत.

आम आदमी पक्षाने हा व्हिडीओ शेअर केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल केलं आहे. व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात दिसत असून यावेळी तिथे स्टॉल लावलेली व्यक्ती त्यांना मास्क घेण्याचा आग्रह करताना दिसत आहे. समोरील व्यक्ती गुजराती भाषेत बोलताना ऐकू येत आहे. वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देताना व्हिडीओत दिसत आहे.

आम आदमी पक्षाने व्हिडीओ शेअर करताना, ‘मोदींसारखं वागू नका, मास्क घाला’ अशी उपहासात्मक टीका केली आहे.

व्हिडीओत नरेंद्र मोदींच्या मागे असणारे अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांनी मास्क घातलेलं दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याचा उल्लेख आम आदमी पक्षाने व्हिडीओत केलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 12:25 pm

Web Title: aap trolls pm narendra modi with video refusing mask sgy 87
Next Stories
1 श्वानासोबत रस्त्यावर झोपलेल्या मुलाची ह्रदयद्रावक कहाणी… वडील तुरूंगात, आई गेली सोडून
2 “लिफ्टची क्षमता ३५० किलोची असताना तो दीड टनचा एसी घेऊन गेला”; महिलेची तक्रार व्हायरल
3 भारतीय रेल्वेवर अदानींचं ब्रॅण्डिंग, मोदी सरकारने दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
Just Now!
X