28 November 2020

News Flash

नेतान्याहू यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कचऱ्याचे डब्बे उलटे केले

नेतान्याहू यांचा दौरा स्वच्छ भारत अभियानापेक्षा महत्वाचा आहे का?

फोटो झाला व्हायरल

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचा भारत दौरा स्वच्छ भारत अभियानापेक्षा महत्वाचा आहे का असा सवाल नेटकरी विचारत आहेत. हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण आहे तो इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक फोटो.

नेतान्याहू यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. मात्र त्यासाठी या परिसरामध्ये बसविण्यात आलेले सर्व कचऱ्याचे डब्बे उलटे करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने ही काळजी घेण्यात आली होती तरी या उलट्या डब्ब्यावरून ट्विटवर चांगलीच चर्चा रंगली.

सिद्धार्थ यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये दिल्ली पोलिसांनी राजघाट परिसरातील सर्व कचऱ्याचे डब्बे उलटे करुन ठेवल्याचे म्हटले आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानापेक्षा सुरक्षा महत्वाची असंही सिद्धार्थने ट्विटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 5:54 pm

Web Title: for security of israeli pm netanyahu delhi police turned dustbins upside down around rajghat area
Next Stories
1 धावपट्टीवर घसरलेले विमान दरीच्या टोकावर अडकले
2 ‘त्या’ फोटोमुळे सिरियन निर्वासिताला मिळाले जिमचे मोफत आजीवन सदस्यत्व
3 Video : मांजर करु शकते; मग तुम्ही का नाही?; मुंबई पोलिसांचा हा व्हिडिओ नक्की बघा
Just Now!
X