25 February 2021

News Flash

PUBG मध्ये महिंद्राचा ट्रॅक्टर पाहताच नेटकरी सैराट

PlayerUnknown’s Battleground म्हणजेच 'पब जी' PUBG या खेळाविषयी गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत.

PUBG

PlayerUnknown’s Battleground म्हणजेच ‘पब जी’ PUBG या खेळाविषयी गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत. सतत मोबाईल आणि नव्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी करणाऱ्यांसाठी PlayerUnknown’s Battleground अर्थात PUBG हे एक नवं करमणुकीचं साधन झालं आहे. मुख्य म्हणजे हा गेम खेळता खेळता अनेकजण त्यात इतके गुंग होत आहेत की आजूबाजूला काय घडत आहे, याचाही अंदाज त्यांना येत नाही. अशा या ऑनलाईन मल्टीप्लेअर गेमची सध्या चर्चा होत आहे ती म्हणजे आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटमुळे. PUBG हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, असाच प्रश्न त्यांनाही पडला आहे, कारण चक्क महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर या गेममध्ये दिसत आहे.

भारतात PUBG खेळणाऱ्यांनी या गेमला असणारा ‘देसी टच’ सर्वांसमोर आणला आहे. हा ‘देसी टच’ म्हणजे, महिंद्रा कंपनीचा 265 DI ट्रॅक्टर. गेममध्ये अनेकदा हा ट्रॅक्टर दिसल्यामुळे बऱ्याच नेटकऱ्यांनी त्याचे स्क्रीनशॉट काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सर्वप्रथम Chocotaco नावाच्या युट्यूबरला हा ट्रॅक्टर दिसला. ज्यानंतर सोशल मीडियावर PUBG आणि महिंद्राचा तो ट्रॅक्टर याच चर्चा होऊ लागल्या.

वाचा : 63 टक्के भारतीय ऑफिसच्या वेळेत सर्च करत असतात फिरायची ठिकाणं

अनेकांनीच आनंद महिंद्रा यांच्या ट्विटर हँडलचा उल्लेख करत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. अनेकांनी ही एक गर्वाची बाब असल्याचही स्पष्ट केलं. सोशल मीडियावर महिंद्रा ट्रॅक्टरच्या होणाऱ्या या चर्चा पाहून आनंद महिंद्रा यांनी आपण या PUBG गेमबद्दल अनभिज्ञ असल्याचं सांगत हा गेम नक्की आहे तरी काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला. या गेममध्ये असणाऱ्या महिंद्रा ट्रॅक्टरला पाहून आपल्याला आनंद झाल्याचं म्हणत त्यांनी पुढे या ट्रॅक्टरचं नेमकं काय होतं, असा प्रश्नही विचारला. तेव्हा आता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांना PUBG समजावून सांगण्यासाठी नेटकरी मदत करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 10:36 am

Web Title: pubg game fans spot mahindra tractor anand mahindra asks whats this game about
Next Stories
1 ‘इट का जवाब राधिका से…’, झोमॅटो आणि नेटफ्लिक्स इंडियाची राधिका आपटेवरुन जुंपली
2 विवेक अग्निहोत्रींच्या अंगलट आला #UrbanNaxals हा हॅशटॅग
3 जगातल्या सगळ्यात महागड्या लिलावात ‘या’ गाडीवर लागली तब्बल ३४१ कोटींची बोली
Just Now!
X