23 September 2020

News Flash

आश्चर्यम..! निर्सगाच्या सानिध्यात जमिनीखाली दडलेले अनोखे गाव

प्रत्येक वर्षी ५५ लाख पर्यटक देतात भेट

अमेरिकेतील जमिनीखाली दडलेले एक अनोखे गाव जगभरातील पर्यटकांमध्ये चांगलेच लोकप्रिय होत चालले आहे. विशेष म्हणजे हे गाव जमिनीपासून जवळपास ३ हजार फुट खाली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध ग्रँण्ड कॅनियन नजकीच्या या अनोख्या गावाला प्रत्येक वर्षी ५५ लाखाहून अधिक पर्यटक भेट देतात. गावाची लोकसंख्या जवळपास २०० च्या घरात आहे. पण गावाच्या नैसर्गिक रचनेमुळे जगभरातील पर्यटक याकडे आकर्षित होतात. येथ राहणाऱ्या रेड इंडियन्सला अमेरिकन नागरिक मानले जाते.

जमिनीखाली असलेल्या या गावाचा सहजपणे इतर जगाशी संपर्क होत नाही. गावाला भेट देणे हे अतिशय अवघड आहे. बहुतांश पर्यटकांना चालतच गावाला भेट द्यावी लागते. रस्ते नसल्यामुळे गावाला भेट देण्यासाठी खेचरांचा वापर करावा लागतो. पण जर पैसा जास्त असेल तर हेलीकॉप्टरद्वारे देखील या अनोख्या गावाला भेट देता येते. या गावाची वेगळीच ख्याती असल्याने प्रत्येक वर्षी जवळपास ५५ लाखहून अधिक पर्यटक याठिकाणी येतात.

निर्सगाच्या सानिध्यात असलेल्या या गावामध्ये टपाल कार्यालय, चर्च व शाळा व कॅफे देखील आहे.

खेचरांच्या मदतीने याठिकाणी पत्र पाठविले जातात. जेमतेम असलेले हे अनोखे गाव पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. याठिकाणी अनेक धबधबे असल्याने गावचे सौदर्यं आणखी खूलून दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 10:28 am

Web Title: tiny american village hidden three thousand feet below the and canyon
Next Stories
1 Video : दोन हत्तींमध्ये जुंपते तेव्हा…
2 Ambani wedding: ‘जिंदगी बन जायेगी’, ‘त्या’ फोटोग्राफरला एवढाच मिळाला होता संदेश
3 पोपटाचा कारनामा, ‘अलेक्सा’च्या मदतीने मागवले आइस्क्रीम
Just Now!
X