नवी दिल्लीच्या तिलुक केसाम या ८ वर्षांच्या मुलाने लिंबो स्केटिंगचा त्याचाच आधीचा रेकाॅर्ड मोडून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. लिंबो स्केटिंग म्हणजे जमिनीला आपले पाय समांतर होतील एवढं खाली वाकून एका आडव्या बारखालून जाणं.  वयाच्या ८ व्या वर्षीच त्याने हा विक्रम केलेला असल्याने तो मोडला जाण्याची शक्यता कमी वाटते आहे. तिलुकचा हा विश्वविक्रम रचतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये तो काही अंतरावरून स्केटिंग करत येताना दिसतो. आपला स्पीड वाढवल्यानंतर तो जमिनीपासून फक्त १ फुटावर ठेवलेल्या आडव्या बार्सच्या खालून जातो आणि तब्बल १४५ मीटर्सपर्यंत तो जातो. त्याने हा विक्रम केल्यावर त्याचाच आधीचा रेकाॅर्ड त्याने मोडला. डिसेंबर २०१५ मध्ये त्याने लिंबो स्केटिंगचा ११६ मीटर्सचा विक्रम केला होता. पाहा त्याने आता रचलेला विश्वविक्रम

 

सौजन्य- यूट्यूब

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा त्या लिंबो बार्सच्या जवळ पोचतो तेव्हा त्याच्या पायांचा स्प्लिट करून तो त्याच्या हातांनी त्याच्या पायाला धरतो आणि त्या लिंबो बार्सच्या खालून जातो. त्याचा हा पराक्रम पाहायला आलेले निरीक्षकसुध्दा धावत असताना त्याच्या मागेच राहतात.
तिलुकच्या नावावर आणखीही अनेक रेकाॅर्ड्स आहेत. त्याचं नाव ‘लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड्स’मध्येही नोंदवलं गेलं आहे. त्याच्या नावाववर ४२ मेडल्स आहेत.  याशिवाय तिलुकला २०१४ साली ‘लिंबो स्केटर आॅफ द ईयर’ अवाॅर्डही मिळाला आहे. त्याने अनेक बाॅलिवूड स्टार्ससोबतही स्केटिंग केलं आहे