हल्ली सोशल मीडियावर काय ट्रेंडिंग होईल, याचा काही नेम नाही. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया साईट्सवर कधी कुणाचे फोटो व्हायरल होतात, कधी कुणाचे ट्वीट्स व्हायरल होतात. कधी कधी तर त्या ट्वीट्सवरच्या कमेंट्सपण व्हायरल व्हायला लागतात. काही ट्विटर हँडल्सवर युनिक प्रकारचे ट्वीट केले जात असतात, ज्याला नेटिझन्स धमाल प्रतिक्रिया देत असतात. उद्योग पती आनंद महिंद्रा हे अशाच प्रकारचे युनिक ट्वीट्स करत असतात. त्याचप्रमाणे ऑनलाईन फूड सप्लाय चेन असलेल्या झोमॅटोचं ट्विटर हँडल देखील अशाच प्रकारचे युनिक ट्वीट्स दाखवत असतं. नुकतंच झोमॅटोनं केलेलं असंच एक ट्विटर नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरलं. त्यावर काहींनी सरसकट प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी ट्रोल करणाऱ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत!

माँ पूछती है, खाना खा लिया?

६ जूनला हे ट्वीट झोमॅटोनं केलं होतं. त्यात फक्त तीन शब्द होते. ‘खाना खा लिया?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. बरं हा प्रश्न देखील थेट देवनागरीमध्ये न विचारता इंग्रजी अक्षरांमध्ये विचारण्यात आला होता. त्यामुळे त्याला एक प्रकारचा अनौपचारिक टच मिळाला. पण त्यावर आलेल्या प्रतिक्रिया याहून अनौपचारिक ठरल्या! काहींनी या ट्वीटचा संदर्भ थेट आईच्या प्रश्नाशी जोडला. घराघरांत आईकडून असाच प्रश्न विचारला जातो. आणि मग त्यानुसार प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी काहींनी बोबड्या शब्दांमध्ये तर काहींनी सरळ शब्दांमध्ये उत्तरं दिली.

 

हे ट्वीट वाचल्यानंतर अनेकांच्या क्रिएटिव्हिटीला ऊत आला. आणि भरघोस प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी लगेच “येस मम्मी” अशी प्रतिक्रिया दिली.

 

 

तर काहींनी उलट झोमॅटोलाच विचारल, “तुम्ही खाऊ घालताय?”

 

काहींनी झोमॅटोलाच चॅलेंज केलं, “हिंमत असेल तर एक महिना फुकट जेवण पाठवा!”

 

एका युजरने तर चक्क मराठीत रिप्लाय केला, “जेवीकरण झालंय, आता २ तास झोपीकरण!”

 

 

Swiggy ने विचारलं, ‘जेवलीस का?’

८५९ ट्विटर युजर्सनी हे ट्वीट कोट करून त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे, तर ३ हजार ९२० युजर्सनी हे ट्वीट लाईक केलं आहे.