वस्तूंचे भाव हे जागेनुसार बदलतात, म्हणजे तुम्ही ती वस्तू कुठे घेता? कुठल्या दुकानात घेता? आणि कधी घेता? यावरुन तिची किंमत ठरते. रस्त्यावर ज्या वस्तू तुम्हाला १०-१५ रुपयांना मिळतात, त्याच वस्तू मॉलमध्ये १००, २०० रुपयाला मिळतात. विमानात तर तिकिटापासूनच सगळं महाग. साधारणत: एक कप चाहा आणि एक समोसा तुम्हाला किती रुपयांना मिळेल? चहा १० रुपये आणि समोसा १५ रुपये. एकूण झाले २५ रुपये तर जास्तीत जास्त दोघांसाठी जातील ३० रुपये. मात्र हेच विमानात किती रुपयांना मिळतं हे तुम्हाला माहिती आहे का? याची किंमत पाहून तुमच्या देखील पायाची जमीन सरकेल. एक कप चहा आणि समोशाचं बिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बिलावर तुम्ही पाहू शकता, मुंबई विमानतळावर चहा, दोन समोसे आणि पाण्याची बाटली (आवा वॉटर) खरेदी केली. चहाची किंमत १६० रुपये होती. दोन समोसेंची किंमत २६० रुपये आणि पाण्याच्या बाटलीची किंमत ७० रुपये आली. अशा प्रकारे एकूण बिल ४९० रुपये झाले. यावर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. काही यूजर्सनी वेगवेगळ्या विमानतळांवर खाण्यापिण्याच्या किमती सांगितल्या. तर एकानं एवढ्यात तर अख्ख्या गावचा चहा होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा बिल

हेही वाचा >> माणुसकीचं दर्शन! ३ महिन्याचं बाळ, रुग्णवाहिका अन् ट्रॅफिक; मुंबईच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या या बिलाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा फोटो @Chacha_huuया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. फोटोला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.