द, VIDEO व्हायरल
Pune Video : छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. शिवरायांचे लाखो भक्त आहेत जे त्यांना मनापासून मानतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगतात. महाराजांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांचा आदर्श जपणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवविवाहित जोडपे नव्या आयुष्याची सुरूवात करण्यापूर्वी महाराजांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. एका चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला दिसत आहे. त्या पुतळ्यासमोर एक नवविवाहित जोडपे हात जोडून महाराजांना वंदन करताना दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. या जोडप्याचे नुकतेच लग्न झाले आहे. नव्या आयुष्याची सुरूवात करण्यापूर्वी त्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले
लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरूवात करतात. या नव्या आयुष्याची सुरूवात करण्यापूर्वी थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेणे गरजेचे असते. अशात या तरुण जोडप्याने थेट महाराजांचे आशीर्वाद घेत लक्ष वेधून घेतले आहे.
su_raj_veer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” नविन लग्न झालेल्या एका जोडप्याने घरी जायच्या आधी महाराजांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. बघुन खुप बरं वाटलं. खरंच खुप चांगला उपक्रम आहे. आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करण्यापूर्वी आपण जसे देवाचे दर्शन घेतो त्याच प्रमाणे महाराजांना वंदन करणे आणि अशी प्रथा चालु करणे हे सर्व युवक आणि युवतींचे कर्तव्य आहे कारण महाराज हे पण आपल्याला देवा पेक्षा कमी नाही (आज रात्री कोथरूड गावठाण येथे गेलो असता टिपलेला व्हिडिओ)”
व्हिडीओच्या कॅप्शनवरून तुम्हाला कळेल की हा व्हिडीओ पुण्यातील कोथरूथ परिसरातील आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही लोकांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “मन जिंकलस भावा” तर एका युजरने लिहिलेय, “जगातलं सर्वात मोठं सुख छत्रपती चरणी, छान दादा.. जय शिवराय” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुशिक्षित आणि अभ्यासू जोडपं आहे ते. कोणाला सांगायची गरज पडली नाही. महाराजांना एकदा तरी आयुष्यात वाचून बघा. आयुष्य बदलून जाईन.”