scorecardresearch

नोकरी मिळवण्यासाठी महिलेने लढवली अजब शक्कल; केकवरच छापून पाठवला अर्ज; पाहा काय उत्तर मिळालं

अमेरिकेची कार्ली पॅव्हलिनॅक ब्लॅकबर्न नोकरीसाठीच्या अनोख्या अर्जामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

नोकरी मिळवण्यासाठी महिलेने लढवली अजब शक्कल; केकवरच छापून पाठवला अर्ज; पाहा काय उत्तर मिळालं
कार्ली पॅव्हलिनॅक ब्लॅकबर्नने आपला अर्ज अगदी हटके तयार केला होता, जो तुम्ही खाऊही शकता. (LinkedIn)

सध्याच्या युगात स्पर्धा इतकी वाढली आहे की काही लोकांना नोकरी मिळत नाही, अनेकांना तर असलेली नोकरी टाकवणेही कठीण झाले आहे. याच भीतीमुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. अमेरिकेची कार्ली पॅव्हलिनॅक ब्लॅकबर्न सध्या तिच्या अनोख्या ‘रेझ्युमे’ म्हणजेच नोकरीसाठीच्या अर्जामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

प्रत्येकाला त्यांचा बायोडाटा अतिशय आकर्षक आणि नेत्रदीपक असावा असे वाटते. जेणेकरून तो लगेचच मालकाच्या नजरेत येईल. म्हणूनच लोक त्यांच्या अर्जावर खूप काम करतात. जर तुमचा अर्ज चांगला असेल तर तुमची नोकरी मिळण्याची शक्यता देखील वाढते. तथापि, बरेच अर्जदार त्यांचे बायोडेटा ईमेलद्वारे किंवा हार्ड कॉपीमध्ये पाठवतात. पण काही कल्पक लोक सामान्य लोकांपेक्षा खूप पुढचा विचार करतात. कार्ली पॅव्हलिनॅक ब्लॅकबर्ननेही आपला अर्ज अगदी हटके तयार केला होता, जो तुम्ही खाऊही शकता.

गच्च भरलेल्या बसमध्ये विद्यार्थ्याला गेटवर लटकून करावा लागत होता प्रवास, अचानक हात सुटला आणि…; पाहा धक्कादायक VIDEO

कार्लीने एका केकवर आपला अर्ज छापून स्पोर्ट्स ब्रँड ‘नायकी’ला पाठवला होता. तिने तिच्या लांबलचक लिंक्डइन पोस्टमध्ये स्पष्ट केले की काही काळापूर्वी तिने आपला अर्ज नायकीला एका केकवर पाठवला होता जो पूर्णपणे खाण्यायोग्य होता. नायकीने ‘जस्ट डू इट डे’साठी मोठा उत्सव साजरा केला, ज्यामध्ये अनेक मेगास्टार्स उपस्थित होते. तिने थोडे संशोधन केले. यानंतर तिला आढळले की नायकीमध्ये एक विभाग आहे, जो नायकीच्या कल्पनांसाठी एक स्टार्टअप इनक्यूबेटर आहे.

कार्लीने पुढे सांगितले की नायकी कोणतीही भरती करत नव्हती. मात्र, तिला असे काही तरी करायचे होते, ज्यावरून ती कोण आहे हे ती सगळ्यांना सांगू शकेल. त्यामुळे ‘जस्ट डू इट डे’ सेलिब्रेशनची माहिती मिळताच तिने केक तेथे पाठवला. यावर ती म्हणाली, ‘मोठ्या पार्टीला केक पाठवण्यापेक्षा चांगला मार्ग कोणता?’ एका मित्राने कार्लीला नेहमीच्या पद्धतीने ईमेल करण्याऐवजी अर्जासह एक केक पाठवण्याची कल्पना दिली.

नमकीन विकणाऱ्याचा हटके अंदाज पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन

या प्रकरणी लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही वापरकर्त्यांनी महिलेच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले, तर काहींनी ही कल्पना आश्चर्यकारक असल्याचे म्हटले. मात्र, काही वापरकर्त्यांनी याला ‘नौटंकी’ म्हटले आहे. एका यूजरने तर गंमतीत लिहिले की, ‘आम्ही देखील अशा पद्धतीचा अवलंब करू.’ काही वापरकर्त्यांनी विचारले की त्या महिलेला नोकरी मिळाली की नाही?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या