मुलं लहानाची मोठी झाल्यानंतर ते स्वत:चा निर्णय स्वत: घेत असतात. अनेकदा तर ते घरी पालकांना काहीच कल्पना न देता महत्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे अशावेळी घरामध्ये मुलं आणि पालकांमध्ये किरकोळ वाद देखील होत असतात. पण हा वाद झाला तरीही वडील आपल्या मुलांविषयी काही वाईट बोलत नाहीत किंवा त्याचं चुकलं हे त्याला तोंडावर सांगाणं कधीकधी टाळतात. पण काही पालक हुशार असतात जे मुलाला थेट तोंडावर न सांगताही त्याला त्याच्या चुकीची जाणीव करुन देतात, कारण शेवटी ‘बाप बाप असतो’ असं म्हणतात.
सध्या अशाच एका वडिलांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ती चर्चा का सुरु आहे हे समजल्यावर तुम्ही पोट धरुन हसाल यात शंका नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ट्विटमध्ये एका मुलाने सांगितलं की, जेव्हा त्याचा आणि वडिलांचा काही गोष्टीवरुन वाद झाला तेव्हा वडिलांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवला होता. जो स्टेटस अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या बागबान चित्रपटाशी संबंधित आहे.
बागबान चित्रपटाविषयी तुम्हाला माहिती असेलच पण ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्या माहितीसाठी सिनेमा कशाशी संबंधित होता जाणून घेऊया, ‘बागबान हा एक असा चित्रपट आहे, ज्यामध्ये पालकांना त्यांच्या मुलांकडून वाईट वागणूक मिळते. पण त्यांनी ज्या मुलाला दत्तक घेतलेलं असतं त्याच्याकडून त्यांना खूप प्रेम आणि आदर मिळतो.’ अशी या चित्रपटाची थोडक्यात कहाणी आहे.
याच चित्रपटाचा संदर्भ घेत आणि आपल्या मुलाला त्याच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी उज्जवल अथराव नावाच्या तरुणाच्या वडीलांनी व्हाट्सअॅपवर एक स्टेटस ठेवला होता ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, “हळू हळू समजायला लागलं आहे की, अमितजींनी बागबानमध्ये ४ मुलं असताना एक मूल दत्तक का घेतले होते.”
हेही पाहा- “हेल्मेट का नाही घातलं?” पोलिसांनी विचारताच तरुण गाऊ लागला गाणं, Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल
या घटनेबाबत स्वत: मुलानेच माहिती दिली आहे, त्याने आपल्या वडिलांच्या व्हॉट्सअॅपच्या स्टेटसचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. जो पाहून अनेकांनी त्याच्या वडिलांच्या स्टेटस ठेवण्याच्या टॅलेंटच कौतुक केलं आहे.
तर अनेकांनी बाप बाप असतो असं म्हटलं आहे. तर काहींनी तुमच्या वडिलांची विनोद बुद्धी उत्तम असल्याचं म्हटलं आहे. सध्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अथर्व उज्जवल केलेल्या ट्विटला आतापर्यंत १८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पोस्ट पाहून अनेकांना हसू आवरणं कठीण झालं आहे. तर अनेकांनी हे विनोदी आहे पण वास्तव आहे असंही म्हटलं आहे.