American girl married Indian man: लग्न केवळ दोन व्यक्तींनाच नाही तर दोन कुटुंबांना जवळ आणतं. प्रेम रंग, रूप, धर्म बघून केलं जात नाही असं म्हणतात. आजकाल भारतातील मुलं परदेशी मुलीशी लग्न करून आपला संसार थाटतात. पण, एकत्र कुटुंबाबरोबर क्वचितच काही जण राहतात. त्यांना आपली वेगळी स्पेस हवी असते. पण, सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात अमेरिकेतील तरुणीने भारतीय मुलाशी लग्न केल्यानंतर कसं तिचं आयुष्य बदललं याबद्दल सांगितलं.

ओडिशातील एका भारतीय पुरुषाशी लग्न करून बेंगळुरूमध्ये स्थलांतरित झालेल्या एका अमेरिकन महिलेने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकन महिला हॅनाने लग्न केल्यानंतर ओडिया कुटुंबाचा भाग बनल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलले याबद्दल माहिती शेअर केली आहे.

हेही वाचा… शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

“ओडिया पुरुषाशी लग्न केल्यानंतर माझे जीवन कसे बदलले,” असं शीर्षक देत तिने हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये नवीन संस्कृती आणि सासरकडच्या मंडळींबद्दल ती बोलली आहे. “मी ओडिया कुटुंबाचा भाग आहे. जेव्हाही आम्ही एकत्र असतो, तेव्हा आम्ही प्रेम, आनंद, जेवण आणि इतर गोष्टी शेअर करतो,” असं ती या व्हिडीओमध्ये म्हणाली. व्हिडीओमध्ये तिच्या सासरकडच्या लोकांनी तिच्यावर केलेलं प्रेम आणि आदरातिथ्य दाखवलं आहे.

व्हिडीओत सासू आणि सासऱ्यांबद्दल बोलत ती पुढे म्हणाली, “ते खूप नम्र आणि दयाळू लोक आहेत. प्रत्येक सुनेला असे प्रेमळ पालक मिळावेत अशी माझी इच्छा आहे.” हॅनाने तिच्या व्हिडीओ पोस्टच्या कॅप्शनमध्ये अशा काळजी करणाऱ्या कुटुंबाचा भाग असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हेही वाचा… विद्यार्थ्याचा प्रताप! मिरचीचा स्प्रे, एअर पिस्तूल अन्…, युट्यूब व्हिडीओ बघून घातला बॅंकेत दरोडा; VIDEO पाहून कपाळावर माराल हात

“नक्कीच, माझ्या पतीशी लग्न केल्यापासून माझ्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण, त्याच्या प्रेमळ कुटुंबाचा भाग बनणे हा एक मोठा बदल आहे. मला माहीत आहे की प्रत्येक सून माझ्यासारखी भाग्यवान नसेल. पण, कदाचित काही पालक हे पाहतील आणि यांची संस्कृती, परंपरा खूप वेगळी असली तरीही या दोघांनी निस्वार्थपणे प्रेम केले असं म्हणून त्यापासून ते प्रेरित होतील,” असंही ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॅनाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, परदेशी संस्कृतींचे अनुसरण करणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे सोपे नाही, परंतु तू खूप चांगलं सांभाळून घेतलंस. तर दुसऱ्याने “तुम्ही दोघं एकत्र खूप सुंदर दिसता, असेच एकत्र राहा” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “आमची संस्कृती प्रेमाने अंगीकारल्याबद्दल धन्यवाद मुली.”