Birthday Celebration Shocking Video : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक वेगवेगवेळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात. हल्ली वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचा ट्रेंड बदलताना दिसतोय, लोक हल्ली घरातच वाढदिवसा दिवशी अगदी भन्नाट डेकोरेशन करतात. केक कापण्याच्या वेळी स्नो स्प्रे, फायर कँडल अशा विविध गोष्टींचा वापर करताना दिसतात. अशाचप्रकारे एक तरुण कुटुंबासह आपला वाढदिवस साजरा करत होता, पण केक कापताना त्याच्याबरोबर अशी काही भयंकर घटना घडली की पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक तरुण आपला १७ वा वाढदिवस साजरा करत आहे. कुटुंबातील लोकांनी त्याच्यासाठी केक आणला आहे, केकच्या शेजारीच ओवाळणीचं ताट ठेवलं आहे. यावेळी एक काका केकवर ठेवलेल्या १७ नंबरची कँडल पेटवतात. मग तो मुलगा त्याच्या दोन्ही हातात ‘फायर कँडल’ घेतो, त्या केकवरील कँडलने पेटवतो, इथपर्यंत सगळं आनंदात सुरळीत सुरू होतं.

पण, नंतर तो तरुण आनंदात दोन्ही हातांनी फायर कँडल हवेत फिरवू लागतो. दरम्यान, कुटुंबातील सदस्य त्याच्या चेहऱ्यावर आणि केसांवर स्नो स्प्रे करतात, यावेळी कँडलमधील आग त्या स्प्रेच्या संपर्कात येते आणि आगीचा मोठा भडका उडतो, ज्यात तरुणाचा चेहरा आणि केस पेट घेतात. पण, जवळच उभ्या असलेल्या महिला आग विझवतात, ज्यामुळे तरुणाला कोणतीही गंभीर इजा होत नाही. परंतु, व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक एका वेगळ्याच भीतीत जगत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@muna__one नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, त्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, यार, हे जवळजवळ दुःखदपणे संपले असते… अशा कँडल कोण वापरतं? तरीही वाढदिवसाच्या शुभेच्छा; दुसऱ्या एका युजरने म्हटले की, भाऊ काहीवेळासाठी घोस्ट रायडर बनला होता. तिसऱ्या युजरने लिहिले की, वेडा, स्प्रेजवळ आग वापरू नका. चौथ्या युजरने म्हटले की, हा विनोद नाहीये, हे खरोखर गंभीर आहे.