Viral video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. यामध्ये एका बैलानं चक्क बसमध्ये चढून प्रवाशांवर हल्ला केलाय.

आपण नेहमी पाहतो, आजकालची पिढी ही मोबाईलमध्ये इतकी गुंतली जाते, की त्यांना आजूबाजूला काय घडतंय, याचं देखील भान राहत नाही. आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी आपल्याला वेळोवेळी सावधान करत असते, की रस्त्यावरून चालताना, गाडी चालवताता किंवा प्रवास करताना मोबाईल खिशात किंवा बॅगेत ठेवा, पण काहीजण एका कानाने ऐकतात, तर दुसऱ्या कानाने सोडून देतात. अशीच मंडळी बसमध्ये बसून मोबाईलमध्ये व्यस्थ असताना बैल बसमध्ये येतो आणि कुणालाच याचं भानं नसतं. पुढे हा बैल जेव्हा हल्ला रु लागतो तेव्हा सगळे इकडे तिकडे पळू लागतात. खिडक्यांमधून उड्या मारू लागतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बस बस स्थानकावर उभी असून प्रवासी आरामात बसमध्ये बसलेले आहेत. याचवेळी दोन बैल अचानक बसमध्ये घुसतात आणि काचा फोडू लागतात. यामुळे प्रवासी घाबरतात. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, प्रवासी खिडक्यांमधून बाहेर पडत आहेत. एक बैल बसच्या आतमध्ये जाऊन काचा फोडत आहे, तर एक बैल बाहेरुन बसला जोरात धक्के देत आहे.  बैल ज्याप्रकारे हल्ला करत आहे ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बैलांनी गोंधळ घातला आहे. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने बैलांना बाहेर काढण्यात हाकलून लावण्यात आले.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @aadi_dev नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “मोबाईलच्या नादात लोक जीवानीशी जात आहेत, या मोबाईलनं सर्वांनाच वेडं केलं आहे.” तर आणखी एकानं “बापरे हे बैल असे कसे बसमध्ये चढले” असा सवाल केला आहे.