रस्त्याने प्रवास करताना जितकी मजा येते, तितकीच अपघाताचीही भीती असते. कारण- अनेकदा कित्येकांना स्वत:ची चूक नसतानाही अपघातात नाहक जायबंदी होण्याचा त्रास सहन करावा लागतो किंवा बळी पडावे लागते. बस किंवा कारने प्रवास करताना अनेकदा तुम्हाला अशा अपघाताच्या घटना पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील दृश्य पाहून तुम्हालाही वाटेल की, बसचालक स्वत:च अपघाताला आमंत्रण देत आहे. कारण- या बसचा ड्रायव्हर हातात बसचे स्टेअरिंग धरण्याऐवजी मोबाईलमध्ये मस्तपणे मश्गूल झालेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याचे समोरच्या रस्त्याकडेही लक्ष नाहीय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बस ड्रायव्हर स्टेअरिंग सोडून बस चालवत आहे. एवढेच नाही तर पुढे न पाहता, तो चक्क मोबाईल बघण्यात रमलाय. हा व्हिडीओ @auto_fashion_pk नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, ड्रायव्हरशिवाय बसमध्ये ६९ प्रवासी प्रवास करीत होते. त्यांचा जीवही ड्रायव्हरच्या हाती होता. अशा परिस्थितीत तुम्हाला एकच गाणं आठवेल- जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय की, भाऊ, अपघाताने माणूस स्वर्गात जात नाही. त्याच वेळी दुसऱ्या एकाने लिहिलेय की, ड्रायव्हर म्हणतो आम्ही तर बुडूच; पण आमच्यासोबत तुम्हालाही घेऊन बुडू.