Car message video: ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे. भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका कारच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बापानं आपल्या लेकीसाठी लिहलेला खास मेसेज वाचून सगळेच भावूक झाले आहेत.

लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुलगी आणि वडील यांचे नाते हे अतिशय खास नाते असते. या नात्यात एकप्रकारचा गोडवा असतो. वडिलांसाठी मुलगी ही राजकन्येपेक्षा कमी नसते. प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना बालपणात एक सुपरहिरो म्हणून पाहते. मुलीला वाटत असते की आपला बाप काहीही करू शकतो. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर ते फक्त तिचे वडिल असतात. एखाद्या वडिलांसाठी त्यांची मुलगी खास असते तेवढंच एका मुलीसाठी तिचे वडिलही खूप स्पेशल असतात. दोघांच्या या नात्याचे अनेक उदाहरणं, फोटो, व्हिडीओ आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांना भावुक करत आहे.

आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय कारवर… तर या कारवर “आई जन्माला पुरत नसते…म्हणूनच जन्माला एक लेक हवी असते…” असं वाक्य कारच्या मागे लिहलं आहे. हे वाचून सर्वच कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ chal_firu_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मींडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर आता अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.