Man Sleeps During Car Crash: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. इथे असंख्य फोटो, व्हिडीओ दररोज शेअर केले जातात. त्यांपैकी काही रातोरात व्हायरल होतात. तर काही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. इथे कधी कधी असे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात ज्यामुळे आपण भावूक होतो तर कधी काही व्हिडीओ पाहून आपल्याला हसण्यावर नियंत्रण ठेवणेही कठीण होते. आता सध्या सोशल मिडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. एका भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर झालाय. पण माणूस मात्र झोपेतून उठलाच नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण नेमकं काय घडलं जाणून घेऊया…

सोशल मीडियावर सध्या एक असाच व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला धक्का देखील बसेल आणि हसूही आवरणार नाही. हा व्हिडीओ आहे एका भीषण अपघाताचा, जिथे कारचा पूर्ण चुराडा झाला, समोरचा आणि मागचा भाग अक्षरशः उडून गेला. सर्वजण घाबरून गेले की आत बसलेल्या लोकांचं काय झालं असेल, मात्र जेव्हा कॅमेऱ्याचं लक्ष ड्रायव्हर सीटकडे गेलं… ते दृश्य पाहून सर्वांचे डोळे थक्क झाले.

अपघात झाला, पण झोपमोड नाही!

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, कारच्या समोरच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती अपघातानंतरही शांत झोपलेला आहे. त्याला ना घाबरलेला चेहरा, ना कसली प्रतिक्रिया. जणू काही त्याला काय घडलंय हेच माहीत नाही. काही लोकांनी तर मजेत त्याला “कुंभकर्णाचा अवतार” अशी उपमा दिली. हे दृश्य इतकं हास्यास्पद आणि अविश्वसनीय आहे की एक क्षण तरी विश्वास बसणार नाही की खरंच असं घडू शकतं. गाडी उद्ध्वस्त झाली पण तो माणूस शांत झोपला होता. असा काय झोपला होता तो? भीषण अपघातानंतरही हलला नाही, खाली दिलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

लोक झाले अवाक!

हा व्हिडीओ Instagram वर @haryana_makhol या हँडलवरून शेअर करण्यात आला असून तो बघता बघता लाखो लोकांनी पाहिला. हजारो लोकांनी कमेंट करून हसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हे दृश्य आता लोकांसाठी एक मनोरंजनाचा विषय बनलंय. मात्र, लोकसत्ता या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही, ही बातमी सोशल मीडियावरून सादर करण्यात आली आहे.